Share

अजितदादा, शिवजयंती साजरी केल्यानेच कोरोना वाढतो का ? राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेचं काय ?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाची शिवजयंती साजरी करण्याबाबत काही नियमावली आखून दिली आहे यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अनेक राजकीय कार्यक्रम,सभा,मेळावे धुमधडाक्यात होत असताना शिवजयंतीवर निर्बंध घातल्यामुळे ऐन थंडीत राज्यातील वातावरण तापलं आहे.

राज्यभरात विविध उपक्रमांसह मर्दानी खेळ, मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरात ही शिवजयंती साजरी केली जाते. फक्त देशात वा राज्यातच नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती परदेशात देखील उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी याआधीच शिवभक्तांकडून आयोजनाची तयारी करण्यात आली होती मात्र ऐनवेळी गृहविभागानं आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

राजकीय पक्ष, विविध संघटनांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. यावर उमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना कोरोना वाढीचं कारण पुढं केलं. मात्र, सत्तेत असलेल्या व अजित पवार ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात संवाद यात्रा जोरदारपणे पार पडत आहे. शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक या यात्रेच्या सभेला उपस्थित राहत असून ना सोशल डिस्टंसिंग दिसतंय, ना प्रत्येकाच्या तोंडाला मास्क !

मग, सत्तेतील पक्षाला राजाश्रय का ? असा सवाल उपस्थित होतोय. अजित पवारांना वाटणारी भीती ही शिवजयंतीच्या आयोजनापुरतीच आहे का ? जे कार्यकर्ते या राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत एकत्र येत आहेत, यातून कोरोना संसर्गाची भीती नाही का ? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे स्वतः देखील या यात्रेत सहभागी आहेत. मग, ज्या शासनातील मंत्रीच आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात शासनाचे नियम पळत नसतील तर जे सामान्य नागरिक एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची तयारी करत होते, त्यांच्यावरच नियमांची जबरदस्ती का ? असे सवाल निर्माण होत आहेत.

राजकीय पक्षांना वेगळा न्याय व सामान्य जनतेला वेगळा न्याय असा पायंडा सद्या पडत आहेत. मग सत्तेतील पक्षांचे कार्यक्रम असो व विरोधी पक्षांचे विविध आंदोलने, न्याय वेगळा असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. १२ जानेवारी रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेसने मोठी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले होते. या रॅलीला परवानगी मिळते, तर शिवजयंतीच्या शोभा यात्रांना का नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे. खरचं कोरोनाची भीती असेल तर कडक नियमावली सर्व कार्यक्रम, आंदोलने, सभा यांना सारखीच असावी अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!