🕒 1 min read
अबुधाबी : काही दिवसातचं टी 20 विश्वचषक 2021 ला सुरुवात होणार आहे. 17 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाणार आहे. आयपीएल संपल्यानंतर लागेचच टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत, साहजिकच आयपीएल खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना परिस्थितीनुसार स्वतःशी जुळवून घ्यायचे असेल. टी -20 विश्वचषकासाठी घोषित केलेल्या भारतीय संघाचे खेळाडू देखील सध्याच्या आयपीएल हंगामाचा एक भाग आहेत. आणि खेळाडू येथे चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.
तर असा एक खेळाडू आहे ज्याचा संघर्ष अजूनही संपलेला दिसत नाही. तो दुसरा कोणी नसून हार्दिक पंड्या आहे. हार्दिक पंड्या गेल्या दीड वर्षांपासून सतत त्याच्या फिटनेससाठी संघर्ष करत आहे. खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्याने जास्त वेळ गोलंदाजी केली नाही पण तरीही त्याला फलंदाज म्हणून संघात ठेवण्यात आले. मात्र, तो फलंदाजीने काही विशेष पराक्रम दाखवू शकला नाही.
जेव्हा हार्दिकला टी -20 विश्वचषकासाठी अष्टपैलू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले, तेव्हा अनेक प्रश्न निर्माण झाले. हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये ना गोलंदाजी करताना दिसला ना फलंदाजी करताना. तरीही त्याला संघात स्थान का देण्यात आले? असे प्रश्न आता सर्वत्र उपस्थित होत आहेत. तसेच त्याला टी -20 विश्वचषकातून वगळले पाहिजे अशी मागणी देखील क्रिकेटप्रेमींकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आनंदराव अडसूळ यांना ज्या प्रकरणात ईडीने समन्स पाठवलं ते प्रकरण नेमकं आहे तरी काय ?
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- पश्चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
