सोलापूर : राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस आरोप-प्रत्यारोपांच्या फैली झडत आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. भाजपला मातीत गाडा, असं वक्तव्य मुंडे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. अक्कलकोट येथे फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचे आज भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. यावेळी त्यांनी मुंडेंवर सडकून टीका केली आहे.
अरे वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मुंबईच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. आम्हाला गाडण्याची भाषा करू नका. चार, सहा खासदार असणाऱ्या पक्षाच्या मंत्र्याने अशी भाषा वापरू नये. आम्हाला मातीत गाडणारे स्वत: मातीत गाडले गेले, पण आम्हाला गाडू शकले नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
एककिडे शेतकरी आत्महत्या करतोय, एसटीचे कामगार संप करत आहेत. मात्र दुसरीकडे हे मंत्री नाचगाण्याचे कार्यक्रम करत आहेत, अशी टीका करतानाच अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. आम्हाला गाडण्याची भाषा करू नका. आमचा एक कार्यकर्ता तुमच्यासाठी पुष्कळ आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सध्याची अवस्था म्हणजे मंत्री तुपाशी अन् कर्मचारी उपाशी’
- एसटी संपाबाबत हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
- केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार- नाना पटोले
- ‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज- राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

