अहमदनगर : राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न जटील बनत चालला आहे. मात्र शासनाकडून अजूनही कुठलंही ठोस आश्वासन मिळत नाही. खासगी वाहतूकदारांकडून अवास्तव भाडं आकारण्यात येत असून प्रवाशांची लूट सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र होत जात असल्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ‘एसटी महामंडळाचा प्रश्न चिघळण्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, सरकारकडे संवेदनशीलता असेल तर त्यांनी किमान कर्मचाऱ्यांशी किमान संवाद साधणं गरजेचं आहे’, असं विखे पाटील म्हणाले आहेत.
आज परिवहन महामंडळ आणि कर्मचारी वाऱ्यावर आहेत. कर्मचाऱ्यांची मागण्या काही आजच्या नाहीत. सध्या मंत्री तुपाशी आणि कर्मचारी उपाशी अशी अवस्था असल्याची टीका विखे पाटलांनी केली. कर्मचाऱ्यांशी तात्काळ संवाद साधणं सुरु करा, असा सल्ला विखेंनी राज्य सरकारला दिला. मुलभूत मागण्या मान्य करून राज्यातील जनतेचे हाल थांबवा, अशी मागणीही यावेळी राधाकृष्ष विखे पाटलांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- एसटी संपाबाबत हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
- केंद्र सरकारने समीर वानखेडेचा देखील वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार- नाना पटोले
- ‘परमबीर सिंग यांना बेपत्ता करण्याचं काम मोदी सरकारने केलं’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- आग प्रतिबंधक सुविधांसाठी २१७ कोटींची गरज- राजेश टोपे
- …या संशोधनातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप भडकू नयेत- संजय राऊत


