🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यातील कोरोना महामारीच्या संदर्भात औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी स्वत: न्या. एस.वी. गंगापुरवाला आणि न्या. एस.डी. कुलकर्णी यांच्या कोर्टासमोर युक्तिवाद केला. न्यालयालयाने सदरील प्रकरणाची गंभीर दखल घेत शासनास आठ दिवसाच्या आत औरंगाबाद जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (घाटी), औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सुपर स्पेशालिटी बिल्डींग, औरंगाबाद सिव्हिल हॉस्पीटल आणि शासकीय कर्करोग रुग्णालयातील वैद्यकीय रिक्त पदांबाबत उच्चन्यायालयाचे लक्ष या याचिकेत वेधले होते. सद्या कोरोना महामारीची परिस्थिती अत्यंत गंभीर असून वैद्यकीय रिक्त पदे भरती संदर्भातील कार्यवाही त्वरीत करणे क्रमप्राप्त आहे. त्याअनुषंगाने उच्चन्यायालयाने शासनाला ५० टक्के रिक्त पदांसंदर्भातील कार्यवाही आठ दिवसाच्या आत सुरु करावी आणि संपुर्ण प्रक्रिया पुढील ६ ते ८ आठवड्यामध्ये संपवून औरंगाबाद जिल्ह्यातील ५० टक्के वैद्यकीय रिक्त पदे भरावी असे आदेश दिले आहेत.
HC orders Maharashtra’s Govt to start recruitment process of filling vacant posts at all Govt hospitals in Aurangabad district within a week and to complete entire exercise within 6-8 weeks. HC took serious note of huge medical vacancies. @asadowaisi @abpmajhatv @zee24taasnews https://t.co/hB7WdOQ8MD
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) May 7, 2021
औरंगाबाद खंडपीठाने याचिकेतील सर्व बाबींवर सखोल शपथपत्र दाखल करण्याचेही आदेशीत केले आहे. पुढील सुनावणी १४ जुन २०२१ रोजी ठेवण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयासमोर खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्तिश: युक्तीवाद करुन आपले म्हणणे मांडले त्यांना अॅड.प्रसाद जरारे यांनी सहकार्य केले तर राज्य शासनातर्फे अॅड. सुजित कार्लेकर यांनी काम पाहिले.
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएल स्थगितीनंतर सकारिया गेला रुग्णालयात ; घेतली कोरोनाग्रस्त बापाची भेट, म्हणाला…
- लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा;उदयनराजे आक्रमक
- ‘मराठा आरक्षण फडणवीसांनी दिले; एकही मराठा मुख्यमंत्री मराठा आरक्षण देऊ शकला नाही’
- आयपीएल -14 चे उर्वरित सामने कधी आणि कोठे होतील? ‘हे’ आहेत पर्याय
- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावे – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
