Share

भिडे गुरुजींच्या विरोधकांना न्यायालयाची चपराक

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा– १६ डिसेंबर २०१८ रोजी मुंबईत शिवडी येथे संभाजीराव भिडे गुरुजींच्या शिवचरित्र आणि सुवर्ण सिंहासनसंदर्भात व्याख्याना वेळी काही संघटनांनी भिडे गुरुजींच्या व्याख्यानाला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. या व्याख्यानासाठी मुंबईतील धारकऱ्यांनी बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग कार्यालयातून रितसर पैसे भरून परवानगी घेण्यात आली होती.

सदर व्याख्यान झाल्यानंतर तब्बल ८ महिन्यांनी ऑगस्ट २०१९ रोजी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी धारकऱ्यांना सांगितले की, तुमच्या विरोधात भीम आर्मी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारत एकता मिशन यांनी तुम्ही भिडे गुरुजींचे जे व्याख्यान घेतले होते तेव्हा पोलिसांची परवानगी घेतली नाही असे तुमच्या विरोधकांचे मत आहे. तुमच्यावर गुन्हा नोंद झाला आहे तेव्हा न्यायालय जो फाईन सांगितील तो भरून टाका आणि विषय संपवा.

जे व्याख्यान कायदेशीर मार्गाने रितसर पैसे भरून घेतले होते त्याविरोधात कोणीतरी खोटी तक्रार केली म्हणून धारकरी मंडळी हा दंड भरण्यास नकार दिला. चुकीचा गुन्हा मान्य करायचा नाही असे धारकऱ्यांनी ठरवले आणि अधिवक्ता श्री. दास यांना याबद्दल संपूर्ण माहिती दिली. त्यांनी ताबडतोब कोर्टात केस डिसमिस करण्यासाठी अपिल केले.

त्या व्याख्यानाला रितसर पैसे भरून महानगर पालिकेची परवानगी घेतली होती. घटना घडली डिसेंबर २०१८ ला आज इतक्या दिवसानंतर त्याविरोधात कोर्टात चार्जशीट दाखल करून गुन्हा कसा काय नोंद होऊ शकतो? असा युक्तिवाद करत न्यायाधीशांकडे न्यायाची मागणी केली. न्यायाधीशांनी सर्व बाजू तपासल्यानंतर भिडे गुरुजींच्या व्याख्याना विरोधातली केस फेटाळली आणि धारकऱ्यांना दिलासा दिला. संभाजी भिडेंच्या च्या विरोधात खोटे गुन्हे नोंद करणाऱ्या विरोधकांना या सगळ्या प्रकरणात न्यायालयाने मोठी चपराक दिली असल्याचे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

फडणवीसांमध्ये दुसऱ्या बाजीरावांचा डीएनए; नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका

मोठा राजकीय खल झाला पण अखेर ‘त्या’ निर्णयावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झालीच – कुल

डॉ. दाभोळकरांच्या हत्येच्या तपासासाठी आता परदेशी संस्थांची मदत

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!