टीम महाराष्ट्र देशा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
अशातच राज्य सरकारने पुरात अडकलेल्या लोकांसाठी अजब निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुराचं पाणी २ दिवस घरात असेल तरच गहू आणि तांदूळ मिळणार असल्याचा अजब निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये या निर्णयामुळे नाराजी पसरली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यानंतर आशिष शेलार यांनी या निर्णयावर भाष्य करताना आधीच्या निर्णयाची आठवण करून दिली होती.
कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सरकारच्या या निर्णयावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. त्यांनी फडणवीस यांची तुलना दुसऱ्या बाजीरावांशी केली आहे. त्यांनी ज्या घरात दोन दिवस पाणी होतं, त्या पूरग्रस्तांना केवळ दहा किलो धान्य देण्याचा सरकारी नियम म्हणजे पूरग्रस्तांची एकप्रकारे थट्टाच आहे. पेशवा दुसरा बाजीरावही अठरापगड जातींना गांभीर्याने घेत नव्हता. संकटात असणाऱ्यांना मदतीचा हात देत नव्हता. मुख्यमंत्री फडणवीसही राज्यातील जनतेला गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांमध्ये दुसऱ्या बाजीरावांचा डीएनए आहे अस पटोले यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना पटोले यांनी मुख्यमंत्री विरोधकांच्या आरोपांना गांभीर्याने घेत नाहीत हे एकवेळ ठीक आहे. पण महाराष्ट्रातील जनतेचं मरण तरी घ्या अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे. दरम्यान नाना पटोले हे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये होते. परंतु त्यांनी निवडणुकीपूर्वी पक्षांतर करत कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पूरग्रस्तांच्या मदतीला, पक्षाचे लोकप्रतिनिधी पूरग्रस्तांना देणार 50 लाख
मोठा राजकीय खल झाला पण अखेर ‘त्या’ निर्णयावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झालीच – कुल
पूरपरिस्थितीचे सरकारला कसलेच गांभीर्य नाही, थोरातांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

