मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती एका प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण ज्यामुळे पुन्हा एकदा जुही चावला प्रकाशझोतात आली आहे.
देशभरात ५जी (5G) सेवा सुरू झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम जीवसृष्टीवर होतील, असा दावा करणारी याचिका केल्याप्रकरणी अभिनेत्री जुही चावला हिला दिल्ली उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठानं (Delhi High Court) गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान दंड ठोठावला होता. यासंदर्भात तिला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
दिल्ली विभागीय न्यायालयाने (Delhi Divisional Court) जुही चावला हिला सबंधित याचिका फेटाळाना २० लाखांचा दंड ठोठावला होता. ही रक्कम कमी करत २ लाख रुपये करण्यात आल्याचं आज दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती विपिन सिंघि आणि जसमीत सिंग यांच्या खंडपीठानं नमूद केलं आहे.
5G Lawsuit | Delhi High Court's Division Bench reduces penalty on actor Juhi Chawla from Rs 20 lakh to Rs 2 lakh
Bench also expunges several observations made by Single Judge during dismissal of lawsuit filed against setting up of 5G wireless networks in the country
(File pic) pic.twitter.com/ZtRX5yHX5W
— ANI (@ANI) January 27, 2022
काय आहे प्रकरण
अभिनेत्री जुही चावलानं गेल्या वर्षी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. देशात ५जी सेवांसदर्भातील अंमलबजावणी झाल्यास त्याचा जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होईल, असं नमूद करतानाच जुही चावलानं या सेवांची देशात अंमलबजावणी केली जाऊ नये, अशी मागणी याचिकेमध्ये केली होती. मात्र, ऑनलाईन सुनावणीवेळी या सुनावणीची लिंक तिनं सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी शेअर केली होती. त्यावरून दिल्ली उच्च न्यायालयातील तत्कालीन एकसदस्यीय खंडपीठानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
एकल खंडपीठाला दंड करण्याचा अधिकार नसल्याचा दावा जुही चावलाच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच, यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय विभागीय खंडपीठासमोर दाद मागण्यात आली. यासंदर्भात आज (गुरूवार) झालेल्या सुनावणीमध्ये जुही चावलाला मोठा दिलासा देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या:
‘सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारला ‘मद्यराष्ट्र’ करू देणार नाही’; भाजप आक्रमक
नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर राजकुमार रावने पत्नी पत्रलेखाचा ‘तो’ फोटो केला डिलीट
शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना तत्परतेने वैद्यकीय सेवा मिळावी; खासदार जलील यांनी घेतली बैठक!
औरंगाबादेत डबलडेकर इलेक्ट्रिक बससारख्या पर्यावरणपुरक वाहनाची गरज-आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

