Share

उत्पादन शुल्क कार्यालयातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर; ८ हजाराची लाच घेताना दुय्यम निरीक्षक अटकेत

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यातील उत्पदान शुल्क कार्यालयातील भ्रष्ट कारभार उघडकीस आला आहे. बियर शॉपीच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी ८ हजार रुपयाची मागणी करून लाच स्विकारल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकासह जवानास अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उमरगा येथे सोमवारी सापळा रचून ही कारवाई केली.

तक्रारदार यांची बियर शॉपी असून त्यांनी बियर शॉपीच्या परवण्याचे नूतनीकरण करण्यासाठी शासकीय चलन भरून परवाना नूतनीकरणासाठी राज्य उत्पादन शुल्कच्या उमरगा येथील कार्यालयास भेट दिली होती. तेव्हा तेथील दुय्यम निरीक्षक सुमित सुधाकर फावडे (वय ३१) व जवान शाम किशोर राऊत (वय ३३) यांनी परवाना नुतनीकरण करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ८ हजार रुपयाची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

एसीबीच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्कच्या उमरगा कार्यालयात सोमवारी सापळा रचला होता. दरम्यान, एसीबीच्या पथकाने या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवान शाम राऊत यास तक्रारदार यांच्याकडून ८ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात दुय्यम निरीक्षक फावडे व जवान राऊत यांच्याविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परवाना नुतनीकरणासाठी लाचेची मागणी करून रक्कम स्विकारल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेतले आहे.एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!