Share

औरंगाबादेत सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या ‘या’ मॅसेजमुळे वाढली मनपाची डोकेदुखी!

Published On: 

औरंगाबाद: स्मार्ट सिटीच्या सहकार्याने महापालिकेने झोन नंबर तीन व चार मध्ये घरोघरी जाऊन मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणासाठी दोनशे कर्मचारी नियुक्त केले असून हे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती घेत आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना वॉर्ड क्रमांक २७ आणि ३० मधील नागरिकांनी सर्वेक्षणाला कडाडून विरोध करीत पथकाला येण्यास मज्जाव केला. तर शहरात अनोळखी व्यक्तीच्या हातात मालमत्तांची कागदपत्रे देऊ नका, असा संदेशही सोशल मिडीयावरून फिरवला जात असल्याने मनपाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

शहरातील मालमत्तांचे जीआयएस मॅपिंगद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. स्मार्ट सिटीने नियुक्त केलेल्या अ‍ॅम्नेक्स कंपनीमार्फत सॅटेलाईज इमेजेसद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक घरांचे व वॉर्डांचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. आता घरोघरी जाऊन मालमत्तांचे सर्वेक्षण करायला १ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. त्याकरिता दोनशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. सुरुवातीला झोन ३ व ४ मधील मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

झोन तीन मधील वॉर्ड क्रमांक २७, शताब्दीनगर आणि झोन चार मधील वॉर्ड क्रमांक ३०, पवननगर मधील मालमत्तांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकाला नागरिकांकडून आता विरोध सुरू झाला आहे. अनोळखी व्यक्तींना मालमत्तांची कागदपत्रे देऊ नका असा संदेशही सोशल मिडीयावरून फिरवला जात असल्याने नागरिकांनी पथकाच्या कर्मचाऱ्यांना मज्जाव केला. त्यामुळे अनेक मालमत्तांचे सर्वेक्षण न करताच पथकाला परतावे लागले. काही माजी लोकप्रतिनिधींकडून देखील पथकाला विरोध केला जात आहे.

मालमत्तांचे सर्वेक्षण करणाऱ्या पथकाला विरोध होत असल्यामुळे मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी तातडीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी मोबाईल क्रमांकासह पोलीस आयुक्तांना सादर केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कुणी तक्रार दिलीतर पोलीसांनी अगोदर मनपा प्रशासनाशी संपर्क तसेच या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करतेवेळी विरोध करणाऱ्या नागरिकांना समज देऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी विनंती पत्राव्दारे केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!