औरंगाबाद : शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवायांचे सत्र सुरूच आहे. यासोबतच रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, बायोवेस्ट, प्लास्टिक बाळगणाऱ्यांविरोधात देखील दंड आकारणे सुरु आहे. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्लास्टिक विरोधी मोहिम तीव्र केली होती. याच पार्श्वभूमीवर सध्या महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यां विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पकडण्यात आले होते.
आजही शहरात १०६० किलो प्रतिबंधीत प्लॅस्टिक १,९०,८०० किमतीचा मुद्देमाल तर ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात प्लास्टिकबंदी असूनही शहरात राजरोसपणे प्लॅस्टिक पिशव्या बाळगून विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले होते. या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक मित्र पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आज एकूण १०६० किलो प्रतिबंधीत प्लॅस्टिक जप्त केले.
सोमवारी (दि. १५) सकाळी नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाध, कर्मचारी देविदास सुसर, रोहिदास गढवे , आत्माराम गवळी, बालाजी साबळे यांच्यासमवेत मोंढा भागात पेट्रोलिंग करत होते. यावेळी जुना मोंढा येथील बिटको ट्रान्सपोर्ट लिमिटेड यांचे येथे २१ बॉक्स प्रतिबंधीत प्लॅस्टिक कॅरी बॅग ज्याचे वजन ६३० किलो एक लाखावर किमतीचा मुद्देमाल आढळून आला.
मुद्देमाल जप्त करून संबधितांकडून २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. प्रशासक पांडेय यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी दैनंदिन जीवनात सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर टाळावा आणि कमी कचरा निर्माण करणाऱ्या जीवनशैलीची निवड करावी. यामुळे शहरात पूर्णतः प्लॅस्टिक वर बंदी आणण्यास मदत होईल.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटर अकाउंट हॅक ?
- आता पदव्यूत्तर विभागाचे अभ्यासक्रम एकसमान राहणार
- तीन वाहने फोडून लॅपटॉप लांबवला
- पोलिसांचा नाकर्तेपणा की मंत्र्यांना मुभा, कोरोनाचे नियम फक्त शिवजयंतीलाच का?
- देशभक्त आणि देशद्रोही मधील फरक मोदींना समजत नाही : प्रियांका गांधी

