Share

उस्मानाबाद जिल्हा कारागृहात ‘एवढ्या’ बंदींना कोरोनाची लागण

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ग्रामीण भागात देखील मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे चांगलेच थैमान घातले आहे. याला नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र तरी देखील कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. जिल्ह्याचा कारागृहात देखील कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तेथील कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

जिल्हा रुग्णालयातील १३० शिक्षाधीन कैदी व न्यायाधीन बंदींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यांच्यापैकी गंभीर नसल्याने त्यांच्यावर कारागृहातच उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान यासाठी जिल्हा रुग्णालयातील एक पथक नेमण्यात आले असून, त्यांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. गतवर्षीही जिल्हा कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. यावेळी त्यांची गेल्या तीन दिवसांमध्ये तपासणी करण्यात आली.

कारागृहात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच प्रकोप केल्याचे समोर आले आहे. येथील शिक्षाधिन कैदी व न्यायाधिन बंदींची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. यामध्ये तब्बल १३० जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील सर्वांची पुन्हा जिल्हा रुग्णालयातील पथकाने व्यक्तिगत तपासणी केली. तेव्हा त्यापैकी कोणालाच अधिक तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. यामुळे त्यांच्यावर आता कारागृहातच २४ तास देखरेख करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांमध्ये यातील काहींना अधिक तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात आणून उपचार केले जाणार आहेत. दरम्यान, त्यांच्यावर पुढील काही दिवस जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!