मुंबई : शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्त आज रायगडावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केले. यावेळी अनेक शिवभक्त रायगडावर हजर होते. या कार्यक्रमानंतर शिवभक्तांशी संवाद साधताना छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.
खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे.
यावरून शिवसेना नेते आणि माजी मंत्री अरविंद सावंत यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार टोला लगावला आहे. छत्रपती संभाजीराजे भाजपचे खासदार आहेत. कोणाविरुद्ध लढतो? कशासाठी लढतोय? हे त्यांनी ठरवलं पाहिजे. सरकार तुमच्याबरोबर आहे. न्यायिक लढाई लढण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. कोणीतरी काढा दिल्यानंतर तुमचा आवाज विरोधात दिसत आहे, असा टोला सावंत यांनी लगावला आहे.
तर, संभाजीराजेंचा आम्ही आदर करतो. भाजपचा या आंदोलनाला छुपा पाठिंबा असू शकतो. राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे हे आंदोलन केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय की सरकार विरोधात आहे? हे संभाजीराजेंनी स्पष्ट केलं पाहिजे, असं देखील सावंत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीकडे समन्वयाचा अभाव’
- अजितदादा शांत झोपा…आम्हाला सरकार पाडण्यात काडीमात्र रस नाही – संजय काकडे
- औरंगाबादचा विकास थांबला; विकास आराखडा पुन्हा लांबणीवर
- शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण – उद्धव ठाकरे
- वैजापूरात उभारला जाणार ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प


