जालना: जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचा कहर चांगलाच वाढला त्याच सोबत मृत्यूचे प्रमाण देखील मोठ्या प्रमणात वाढले होते. त्याच सोबत अजून एक रोग डोके वर काढत आहे, तो म्हणजे म्युकरमायकोसीस. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे म्युकरमायकोसीस अशा कोंडीत जालनेकर सापडले होते. मात्र आता कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे त्यामुळे आता थोडा दिलासा मिळत आहे.
कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत तर घट होतेच आहे यासोबतच यशस्वी औषधोपचाराने कोरोनातून बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे जिल्हा आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. सर्वाधिक बेडची क्षमता असलेल्या जिल्हा रुग्णालयात ४० टक्के तर सबंध जिल्हाभरात ६० टक्क्यांहून अधिक बेड रिकामे झाले आहेत. खासगी रुग्णालयांतही हेच चित्र आहे.
जिल्ह्यात कोरोनावर उपचार करणाऱ्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड केअर सेंटर अशा एकूण ६८ आरोग्य संस्थांमध्ये सध्या केवळ ६७२ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आठही तालुक्यांतील कोविड केअर सेंटर्समध्ये १ हजार ८५६ बेडची क्षमता असताना प्रत्यक्षात १६१ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या घटल्याने आता फक्त १ हजार १०८ रुग्ण उपचार घेत असून ५ हजार २६३ बेड रिकामे आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी अजूनही अत्यवस्थ रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे गाफील न राहता प्रत्येकाने नियमांचे काटेकोर पालन केलेच पाहिजे. दुखणे अंगावर न काढता लक्षणे दिसू लागताच तत्काळ चाचणी करून त्वरीत उपचार घ्यावेत. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने स्वतंत्र १०० बेड तयार करत आहोत. यात पालकांनी खऱ्या अर्थाने अधिक जागरूक असण्याची गरज आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचीकीत्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने केला राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच मारावी लागेल – सामना


