नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक खोलवर झाला आहे. तसेच मृतांचा आकडाही झपाटयाने वाढताना दिसत आहे. परिणामी ग्रामीण जीवनाची घडी पूर्णपणे विस्कटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठी आर्थिक रसद पाठवली आहे. कोरोनासंबधी उपाययोजना आणि पीडितांना दिलास देण्यासाठी मोदी सरकारने 25 राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना तब्बल 8,923 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. यापैकी 861 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे. तर उत्तर प्रदेशला सर्वाधिक 1441 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना ८९२४ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले असून यातील ८६१ कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत. @nsitharaman @nstomar pic.twitter.com/kSohfxgF9R
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 9, 2021
हे पैसे ग्राम पंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना देण्यात येतील. कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे विकत घेण्यासाठी आणि सुविधा सुदृढ करण्यासाठी हा पैसा वापरता येईल. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- कामे वेळेत व दर्जेदारपणे पू्र्ण करा, अन्यथा काळ्या यादीत टाकू; अशोक चव्हाण आक्रमक
- ‘दरेकरजी, तुम्हाला ‘ती’ लिंक पाठवायची का?’ रुपाली चाकणकरांनी केले ट्विट
- परदेशातून काय मदत आली, हे आदित्य ठाकरे यांना विचारा; दरेकरांचे जयंत पाटलांना प्रत्युत्तर
- नरेंद्र मोदींनी देशाला ‘चीनचा कचरा, चिंता आणि चिता’ हे तीन ‘चि’ दिले – नाना पटोले
- पाया काय पडता प्रस्ताव पाठवा ; मेटेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले


