मुंबई : ‘सध्याच्या परिस्थितीत राजकारण केलं तर लोकांना ते आवडतं नाही. तुम्ही जे करणार आहेत. त्यांचे श्रेय तुम्हाला आणि पक्षाला मिळणारच आहे. आपल्या सेवाकार्याचा लोकांना माहित होणं इथपर्यंत प्रचार करणं गरजेचे आहे. त्यांचा फार बागुलबुवा करु नका, सध्याच्या काळात सर्वांना मदत करणं गरजेचं आहे. सर्वांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न करा. यात राजकारण करु नका. त्यासाठी झेंडे लावू नका’ असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेय.
यावरून भाजप विरोधकांनी भाजपच्या नेत्यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गडकरींचा हा मुद्दा छेडत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकांवर टीका केलीय.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की, त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये. अशी वक्तव्य करून मोदीचा अपमान करताय, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.
वक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय.नितीनजी गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे , ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही, वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 10, 2021
तसेच ‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही. वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो’, असा टोला चाकणकर यांनी ट्विटद्वारे लगावला.
काय म्हणाले होते प्रवीण दरेकर?
राज्यात कोरोना लसींच्या तुटवड्यावरून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे बोट दाखवले आहे. यावर भाजप नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, हा तुटवडा राज्य सरकारकडून जाणुनबुजून तयार केला जातोय. केद्र सरकारने लसींचा मुबलक साठा पाठवला असून ठाकरे सरकार जाणुनबुजून तुटवडा निर्माण करतंय, असा गंभीर आरोप त्यांनी केला.. तसेच ‘दूध का दूध, पानी का पानी’ करण्यासाठी राज्य सरकारने आजपर्यंत केंद्राकडून आलेली मदत आणि त्यांनी नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा या दोन गोष्टींची श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान प्रविण दरेकर यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींकडून कौतुक, पण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडले’, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल
- ‘मोदींनी राज्यपालांना कार्यमुक्त करून मंत्रीपद द्यावे’, नवाब मलिकांचा टोला
- आता ‘या’ मोठ्या शहरात १२ मे पासून पूर्ण लॉकडाऊन !
- ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना टोल माफी, केंद्राचा निर्णय
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे

