Share

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार ! ‘या’ १७ शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन

Published On: 

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून आता जिल्हा पातळीवर पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

जवळपास अर्धा महाराष्ट्र पूर्ण लॉकडाऊनच्या गर्तेत गेला आहे. १७ शहरांसह जिल्ह्यांमध्ये देखील पूर्ण लॉकडाऊन लावण्यात येत आहे. एकाबाजूला मुंबईसह महाराष्ट्राचं कौतुक केंद्रीय स्तरावर केलं जात असलं तरी ग्रामीण महाराष्ट्रासह काही शहरांमध्ये कोरोनाचा उद्रेक होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन कठोर पाऊल उचलत आहे.

‘या’ १७ शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन !

नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, वर्धा, सांगली, सातारा, बुलढाणा, बीड, नांदेड, वाशिम, अमरावती, यवतमाळ, अकोला, सिंधुदुर्ग, इंदापूर, बारामती या १७ शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान, यातील काही शहरांमध्ये येत्या २ दिवसात पूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जरी पूर्ण लॉकडाऊन नसला तरी या शहरांचा व जिल्ह्यांचा आढावा घेतल्यास अर्धा महाराष्ट्र पूर्ण लॉकडाउनच्या स्थितीमध्ये गेला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!