वर्धा : राज्यासह देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांमध्ये होणाऱ्या लक्षणीय वाढीमुळे आरोग्य व्यवस्थांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अपुऱ्या व्यवस्थेसह डॉक्टर्स, रुग्णालय कर्मचारी, नर्स हे कोरोना विरोधात लढा लढत आहेत. मात्र, अशा काळात देखील डॉक्टरांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
अशातच आता काँग्रेसच्या आमदाराने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे. कामात काही त्रुटी असल्यास योग्य पद्धतीने संवाद वा तक्रार साधून ते काम होणे अपेक्षित असते. मात्र, लोकप्रतिनिधीच अधिकाऱ्यांचा मान ठेवत नसतील तर सामान्य जनतेसमोर काय आदर्श निर्माण होणार ? असा सवाल निर्माण होत आहे.
काय आहे हे प्रकरण ?
माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवीगाळ केल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसअधीक्षकांना तक्रार दिली आहे.
देवळी तालुक्यात नाचणगाव येथील शाळेत अँटीजन, आरटीपीसीआर चाचणीच शिबिर घेण्यात आलं. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी छायाचित्र काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. हे फोटो दिसल्यानंतर आमदार कांबळे यांनी फोन केला. फोनवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीव मारण्याची धमकी दिली.
‘तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता… तुला चप्पलेनं मारला नाही, तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटत की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार,’ अशी शिवीगाळ केली. तसेच, तालुका अधिकाऱ्यांनाही कांबळे यांनी धमकावले आहे, असं डवले यांनी तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. डवले यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘केंद्राने लसींचा मुबलक साठा दिलाय, मात्र राज्य सरकार जाणूनबुजून तुटवडा निर्माण करतंय !’
- आता ‘या’ मोठ्या शहरात १२ मे पासून पूर्ण लॉकडाऊन !
- चंद्रकांत पाटलांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला चांगलच ठाऊक ; मुश्रीफांचा टोला
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

