Share

कोरोनाची परिस्थिती गंभीर,मुंबईसह राज्यात लॉकडाऊन गरजेचे : माजी आरोग्यमंत्री

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात आज नव्याने १६६२० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे आकडे वाढतच चाललेले आहेत.

राज्यात सद्या कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. गेल्या काही महिन्यांत कोरोना वाढीचे प्रमाण आटोक्यात आल्याने जनजीवन सुरळीत झाले होते, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढल्याने कडक निर्बंध लावण्यात येत आहेत.

मुंबईत धारावी, अंधेरी पूर्व व पश्चिम ,मालाड,बोरिवली याभागात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मुंबई सह राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबई सह राज्यात लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याची विनंती राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

मुंबई मध्ये नागरिकांच्या बेपर्वाईला आळा घालण्यासाठी थोडी सक्ती करणे आवश्यक आहे. कारण वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता आयसीयू बेड,ऑक्सीजन बेड यांची जास्त गरज पडेल. पुढील पंधरवडा जास्त कसोटीचा आहे. रेमीडिसिव्हरचा वापर लवकर करणे गरजेचे आहे.

तसेच एसओपी व प्रोटोकाल तयार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने अंमलबजावणी करून कोरोनाला आला घालणे गरजेचे आहे. तसेच टेस्टिंग,ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट कडक केल्यास कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा बसेल असे डॉ.दीपक सावंत यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!