Share

नाथ षष्ठीवर यंदाही कोरोनाचे सावट ! वारकऱ्यांविना पैठणमधील रस्ते सुने सुने

Published On: 

पैठण : कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी नाथ षष्ठी सोहळा रद्द करण्यात आला आहे. वारकरी भाविकांना दिंड्या घेऊन येण्यास तसेच पैठण शहरात येण्यास मनाई आहे. त्यामुळे आज एकनाथ षष्ठी सोहळ्याचा पहिला दिवस असतांना पैठण शहराकडे येणारे सर्व रस्ते भाविक व भगव्या ध्वजाविना सुने सुने दिसत आहेत. नाथ वंशज, पुरोहीत व भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधि पूजा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सुद्धा नाथ षष्ठी सोहळा रद्द करण्यात आला असल्याने केवळ परंपरा जोपासण्यासाठी नाथ मंदिरात पूजा अर्चा करण्यात येणार आहे. आधी वीस लोकांना परवानगी देण्यात आली होती. परंतु पुन्हा नवीन आदेश काढून पाचच जणांना पूजा अर्चा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या आदेशामुळे नाथ वंशज, भविकात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आज एकनाथ षष्ठी असल्याने नाथांच्या राहत्या वाड्यातील पादुकाची विधिवत पूजा करण्यात आली व मानाची दिंडी गावातील नाथ मंदिरातून गोदावरी नदीच्या पात्रातून बाहेरील समाधी मंदिरात नेण्यात आली. वास्तविक पाहता एकनाथ षष्ठीला राज्यातून आलेल्या सुमारे साडे पाचशेच्या वर दिंड्या प्रदक्षिणा घालून आपल्या फडात भजन, कीर्तन, भारूडे करण्यासाठी निघून जातात. मात्र आज पैठण नगरीत एकाही दिंडीला प्रवेश देण्यात आला नाही त्यामुळे रस्ते सुने सुने दिसत आहेत.

तसेच कुठेही फड लावण्यात आले नसून संपूर्ण वाळवंट रिकामे दिसत आहे. गोदावरी नदीत स्नान करतांना भाविक वारकरी दिसून आले नाहीत. नाथ षष्ठी सोहळा तीन दिवस साजरा होत असल्याने भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे. पोलीस निरीक्षक किशोर पवार हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कालाष्टमीला सूर्यास्ताच्या वेळी नाथ समाधी मंदिरात नाथ वंशजांच्या हस्ते तसेच नाथ संस्था, वारकऱ्यांच्या हस्ते दही हंडी फोडून नाथ षष्ठी सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!