🕒 1 min read
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तर, एटीएसने देखील सचिन वाझेंना या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून घोषित केलं आहे.
या प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तर, एटीएसने देखील सचिन वाझेंना या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून घोषित केलं आहे.
या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळत आहे. आणि त्यातच आता भाजप नेते आणि खासदार नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंवरही गंभीर आरोप केले आहेत.
‘महिन्याला १०० कोटी जमवायचे आणि अनिल देशमुखकडे नेऊन द्यायचे ही सचिन वाझेवर जबाबदारी होती, सचिन वाझे नेमका कोणासाठी काम करत होता. जनतेच्या सुरक्षेसाठी की मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पैसे पुरवण्यासाठी काम करत होता. एनआयएच्या चौकशीतून खरी गोष्ट लवकरच बाहेर येईल.’ अशी टीका त्यांनी केलेली आहे.
‘या सरकारला एवढे दिवस माहीत नव्हतं काय? वाझेचे किती फ्लॅट आहेत माहीत नाही, मध्यमवर्गीयांना साधी चाळीत रुम घेणं अवघड आहे. पण वाझेचे कुलाब्यापासून अख्ख्या मुंबईभर फ्लॅट आहेत. अशा माणसाला खात्यात घ्यायचं काम शिवसेनेनं केल आहे. या सचिन वाझेला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे.’ असा घणाघाती आरोप राणेंनी यावेळी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन वाझेसोबत हॉटेलमध्ये येणारी ‘ती’ बाई कोण?, राणेंचा संतप्त सवाल
- पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन, दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी…
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ‘प्रिय EC, माजरा क्या है ?’ भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडल्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल
- Breaking : पुण्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘हे’ असणार कडक निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
