मुंबई : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल १ हजार ३४१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या ४ दिवसांपासून रोज देशभरात १ हजारहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांची आकडेवारी पाहाता देशभरात एकूण २ लाख ३४ हजार ६९२ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
महाराष्ट्रात देखील कोरोनाची स्थिती अधिक भयावह होत आहे. राज्यात काल (१६ एप्रिल ) ६३ हजार ७२९ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे तब्बल ५९ हजार ५५१ जणाचा कोरोनाने बळी घेतला आहे.अनेक नेते अभिनेते या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.
बॉलिवूड इंडस्ट्रीत कोरोनाने कहर केल्याचे पाहायला मिळत आहे. आता अभिनेता अर्जुन रामपालही कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. काल शनिवारी बॉलिवूडचे पाच बॉलिवूड स्टार्स कोरोनाचे शिकार ठरलेत.अर्जुन रामपालने ट्विटरवरून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.
???? pic.twitter.com/vT1x5pauI7
— arjun rampal (@rampalarjun) April 17, 2021
‘माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत. मी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे आणि आरोग्याची काळजी घेत, सर्व नियमांचे काटेकोर पालन करतोय. काही काळ तरी स्वत:ची काळजी घ्या, यामुळे फायदाच होईल. आपल्याला एकत्र येऊन कोरोनाशी लढा द्यावा लागेल,’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अर्जुन रामपालआधी काल शनिवारी अभिनेता नील नितीन मुकेश, सोनू सूद, सुमीत व्यास व मनीष मल्होत्रा हे सगळे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेत
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचे गांभीर्यच नाही; शिरूरमध्ये संचारबंदितही लोकांचा मुक्त संचार
- सलग विजयानंतर हॅटट्रिकसाठी सज्ज असलेल्या आरसीबीसाठी आनंदाची बातमी
- रेमडेसविरचा मोठा साठा पडून, केंद्राने ‘तो’ साठा उपलब्ध करून द्यावा – मनसे
- …तर ऑलम्पिकमध्ये महिला व पुरुष दोन्ही क्रिकेटचे संघ खेळणार
- बीडमध्ये राबवले जाणार ‘मिशन झीरो डेथ’ अभियान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

