🕒 1 min read
लातूर : लातुर जिल्ह्यातील पोलिस अधिक्षक पिंगळे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी कोरोना लसीकरन केंद्रात जाऊन लस टोचुन घेतली. कोरोना लसीकरणाचा राज्यात दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्पात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोवीड लस दिली जाणार आहे.
कोरोना संसर्गानंतर जवळपास दहा महिन्यानी कोवीड लस उपलब्ध झाली. या लसीकरणासाठी सरकारने प्रथम प्राधान्य हे आरोग्य सेवकाना दिले होते. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी प्राधान्य हे फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना देण्यात आले. या टप्प्यात पोलीस कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी यांना लसीकरण करण्यात येणार होते. या लसीकरण मोहीमेत भाग घेण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी सकाळी ११ वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील लसीकरण केंद्रात जाऊन लस टोचून घेतली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख व इतर उपस्थित होते. कोवीड लस ही पुर्णपणे सुरक्षित आहे. यामध्ये कोणताही धोका नाही. तेव्हा प्रत्येकाने समोर येउन कोवीड लस घ्यावी असे अवाहन पोलिस अधीक्षकांनी केले.ज्य़ांनी कोवीड लसीकरणासाठी नोंद केली आहे. त्या सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे असे अवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी यावेळी केले
महत्वाच्या बातम्या
- १५०० स्वेअर फूटापर्यंतच्या बांधकामाला परवानगीची गरज नाही- शिंदे
- एकापाठोपाठ एक विकेट्स पडत असताना रोहित शर्मा मैदानात पहाडासारखा उभा राहिला
- माथाडींच्या पीएफ घोटाळ्याची चौकशी करा, खा.जलील यांची संसदेत मागणी
- औरंगाबाद पालिकेत होणार मेगा नोकरभरती, नगरविकासमंत्र्याची घोषणा
- बसस्थानक परिसरात व्यवसायासाठी जागा द्या, अब्दुल सत्तार यांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
