मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशात सध्या चौथ्या टप्यातील लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे, कंपन्या, आणि कारखाने बंद आहेत. नोकदारवर्ग घरी बसून आहे. त्यामुळे या नोकरदार वर्गाचा पगार करायचा कसा ? असा प्रश्न मालकांसमोर पडला आहे. तरी देखील केंद्र सरकारने या लॉकडाऊनच्या काळात कोणाचाही पगार कापू नका असा आदेश दिला आहे. मात्र परिस्थिती ही हाताबाहेर गेली असल्याने हा आदेश केंद्र सरकारने मागे घेतला असल्याचं बोलत जात आहे.
केंद्राने आदेश मागे घेतल्यामुळे मालकांना दिलासा मिळणार असला तरी नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात केंद्र सरकारने नोकरदार वर्गाचे पगार कापू अथवा कोणालाही कामावरून काढू नका असे आदेश दिले होते. मात्र गेली दीड महिना कंपन्या आणि कारखाने हे कुलुपबंद आहेत. त्यामुळे नोकरांना पगार देयचा कसा असा प्रश्न कारखानदार मालकांनी उपस्थित केला आहे.
यावर आता केंद्र सरकारने आपला आदेश मागे घेतला असल्याचं बोललं जात आहे. कारण लॉकडाऊन 4 च्या नवीन नियमावलीत हा नियम दिसत नाही. तो काढून टाकण्यात आला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रत्येक कारखाना अथवा कंपनी आपल्या स्तरावर निर्णय घेऊन नोकरदारांच्या पगाराबाबत विचार करणार आहे. मात्र आता नोकरदार वर्ग चांगलाचं चिंतेत असणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

