धुळे : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे.आज या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे.
यापैकी धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल देखील लागला आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल विजयी झाले आहेत. पटेल यांची भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली होती. दरम्यान,अमरिश पटेल विरोधकांची 115 मतं फोडण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपाचे 199 तर महाविकास आघाडीचे 213 मतदान केले होते. काँग्रेसच्या किमान 57 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले असून, काँग्रेसचं संख्याबळ 157 असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाली आहेत. आघाडीच्या किमान 115 मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे तर 4 मते बाद झाली आहेत. महाविकास आघाडीची 213 मते असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील.विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप पहिल्यांदाच समोरासमोर लढले आहेत.
महत्वाच्या बातम्या
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
साताऱ्यात दोन्ही राजेंच्या विरोधात राष्ट्रवादी ठोकणार शड्डू!
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
सर्वोत्कृष्ट गीतकार उदित नारायण यांचा ६५ वा जन्मदिवस
धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!


