पुणे : राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तर, पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
देशातील सर्वाधिक ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुण्याचा अव्वल क्रमांक आहे. यासोबतच, दररोज कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असतानाच आता एक धक्कादायक बाब समोर येत आहे. आजच्या दिवशी पुणे शहरामध्ये एकही आय़सीयु बेड शिल्लक नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत गंभीर रुग्णांनी काय करायचे? हा प्रश्न आता त्यांच्या नातेवाईकांना पडला आहे. पुण्यात दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची नोंद आहे. अनेकांना कोरोनाच्या त्रासाने ऑक्सिजन व्हेंटिलेटर, आयसीयुची गरज भासते. परंतु कोरोना रुग्णांची बेफाम वाढ पाहता. शहरात ऑक्सिजनचे फक्त ४७ तर, ऑक्सिजन विरहित ७३३ बेड शिल्लक आहेत.
तसेच पुण्याला पीएम केअर फंडातून मिळालेले तब्बल ५८ व्हेंटीलेटर्स खराब निघाल्याची तक्रार ससून रुग्णालयाचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी बेड्स देखील शिल्लक नसतानाच ५८ व्हेंटिलेटर्स खराब असल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त केला आहे. ‘पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर सारखे बंद पडतात, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेनं चालत नसल्याने धूळ खात पडून आहेत,’ अशी तक्रार डॉ. मुरलीधर तांबे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात होणार ‘इतके’ दिवस कडक लॉकडाऊन, राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवा – संजय बनसोडे
- पुण्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या नामांकित हॉस्पिटलच्या नर्सला बेड्या
- ‘नियम पाळणं हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार’
- भाजप आ.सुरेश धस यांच्या मागणीची महाविकास आघाडीकडून दखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

