औरंगाबाद: राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत, या वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी रुग्ण संख्येत वाढ होतंच आहे. या वाढत्या रुग्णवाढीचा फटका अनेक रुग्णालये तसेच कोविड केअर सेन्टर्सला बसत आहे. त्यामुळे कोविड सेन्टर्सची संख्या देखील वाढवण्यात येत आहे.
आता कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. या रुग्णांवर उपचाराच्या अनुषंगाने तसेच शहरातील घाटी रुग्णालय, मिनी घाटी (जिल्हा सामान्य रुग्णालय) व खासगी रुग्णालयांचा भार कमी करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील १६ खासगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामुळे खेड्या-पाड्यातील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ग्रामीण भागातील अनेक रुग्ण सुविधा नसल्याने उपचारासाठी शहराकडे येतात त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कोव्हीड उपचार करू शकणाऱ्या एकूण १६ सक्षम खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हे करत असताना रुग्णालयातील उपचार यंत्रणा, बेड्सची संख्या, आयसोलेशन बेड्स, ऑक्सीजन बेड्स, व्हेन्टिलेटर्स, आयसीटीयू बेड्स आदी अटी घालण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

