औरंगाबाद : मराठवाडा विभागामध्ये कोराेना ( covid-19) चा संसर्ग खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनची आवश्यकता लागत आहे. त्यामुळे ही मागणी लक्षात घेता औरंगाबाद विभागास पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करुन देण्याची मागणी शनिवारी आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.
मुरबाड येथील लिंडे कडून उपलब्ध होणारा द्रवरूप ऑक्सिजन (LMO) हा नाशिक धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्याकरिता राखीव ठेवला आहे. त्यामुळे तेथून औरंगाबाद विभागातील कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध होत नाही. (J S W) डोलवी, जिल्हा रायगड येथून देखील औरंगाबाद विभागास ऑक्सिजन LMO अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध होतोय. या स्त्रोतांचे सनियंत्रण हे लिंडे मुरबाड यांच्यामार्फत करण्यात येते. टाएनिपॉन Ailig , चाकण यांचेकडून औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा वापर केला जातोय. ही सर्व परिस्थिती पाहता औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यात कोणत्या कंपनीकडून ऑक्सिजन मिळेल, याबाबतचे तातडीने लेखी आदेश देणे अत्यंत आवश्यक असल्याचेही या निवेदनात आमदार दानवे यांनी म्हटले आहे.
आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्रानुसार ऍक्टिव्ह केसेस चे प्रोजेक्शन दिलेले आहेत, त्यानुसार औरंगाबाद विभागाची प्रति दिन 225 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी ही साधारण 15 ते 20 एप्रिल पर्यंत जाणार आहे. त्यामुळे 15 एप्रिल नंतर कमीत कमी मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता प्रतिदिन विभागास लागणार आहे. मागील आठवड्यात आवश्यक ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होण्यास अडचणी येवू शकतात. तसेच रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास रुग्ण अतिगंभीर होण्याचा धोका आहे. रूग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती बघितल्यास साधारणतः प्रति रुग्ण प्रतिमिनिट 21 लिटर या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर होत आहे.
ऑक्सिजन पाईपचे लिकेजस व गरजेइतका ऑक्सिजन रुग्णांना मिळत आहे का याबाबत रुग्णालयातील ऑक्सिजनचे ऑडिट करून प्रत्यक्ष उपाययोजना करणे चालू आहे याकरिता अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे. तरी या परिस्थितीचा विचार करून औरंगाबाद विभागास प्रतिदिन 225 मेट्रिक टन या प्रमाणात नियमित ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागास आपल्या स्तरावरून निर्देशीत करावे, अशी मागणी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्रीकडे शनिवारी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा
- आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंचे तिहेरी सुवर्णयश
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!


