नवी दिल्ली : रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यातच अनेक मेडिकल चालक इंजेक्शन अव्वाच्या सव्वा किमतीला विकून रुग्णांची लूट करत आहेत.
रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय पाहून केंद्र सरकारने रेमडेसिवीरचं उत्पादन दुप्पट करण्याची परवानगी दिली आहे. तसेच सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीर निर्मिती करण्याऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे कोरोना रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.
To meet the increasing demand of #Remdesivir and to enhance its availability and affordability, the Govt has capped its price. @PMOIndia #Unite2FightCorona @MoHFW_INDIA pic.twitter.com/G1MoAjMvB2
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) April 17, 2021
नवे दर पुढीलप्रमाणे
कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड रेमडॅक इंजेक्शनचा दर २८०० रुपयांवरून ८९९ रुपये
सिजीन इंटरनॅशनल लिमिटेडनं रेमविन इंजेक्शनचा दर ३९५० रुपयांवरुन २४५० रुपये
डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीज लिमिटेडनं रेडिक्स इंजेक्शनचा दर ५४०० रुपयांवरून २७०० रुपये
सिपला लिमिटेडनं सिप्रेमी इंजेक्शनचा दर ४००० रुपयांवरून ३००० रुपये
मायलॅन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेडनं डेसरेम या इंजेक्शनचा दर ४८०० रुपयांवरून ३४०० रुपये
ज्युबिलँट जेनेरिक लिमिटेडनं जुबी-आर इंजेक्शनचा दर ४७०० रुपयांवरून ३४०० रुपये
हेटेरो हेल्थकेअर लिमिटेडनं कोविफोर या इंजेक्शनचा दर ५४०० रुपयांवरून ३४९० रुपये
कोरोनाची दूसरी लाट आल्याने रेमडेसिवीरची मागणी वाढली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्याच्या निर्यातीवर रविवारी बंदी घातली. या इंजेक्शनची साठेबाजी आणि काळ्याबाजाराला आळा घालण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर आता रेमडेसिवीरचे दरही कमी केलेत. या निर्णयाचे स्वागत होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजप सत्तेत नसलेल्या राज्यांवर केंद्राचा अन्याय’ सोनिया गांधींची टीका
- देश जळत असताना आधुनिक निरो निवडणूक प्रचारात मग्न’, सचिन सावंतांचा मोदींवर हल्लाबोल
- ‘कोरोना नाहीच, पैशासाठी बिल गेट्सच्या डोक्यातील ही कल्पना’, बंडातात्या कराडकर यांचा दावा
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

