औरंगाबाद : कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने शहरात १२१ केंद्रावर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. आता शहरातील व्यापारी, बँक अधिकारी-कर्मचारी व कंपनी कामगारांसाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (दि. १९) शहराच्या विविध भागात हे २३ केंद्र सुरू होतील, असे लसीकरण मोहिमेच्या प्रमुख उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.
कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने पाच एप्रिलपासून शहरात लसीकरणाची जम्बो मोहीम हाती घेतली आहे. ११५ वॉर्डात १५५ केंद्र व इतर सहा केंद्रावर दररोज सरासरी सहा ते सात हजार जणांना लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महापालिकेने दीड लाख नागरिकांना लस टोचण्याचा टप्पा पार केला आहे.
असे असले तरी काही वॉर्डात लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने महापालिकेने विशिष्ट घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. व्यापारी व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचारी, बँक अधिकारी-कर्मचारी व कंपनी कामगारांचा जास्तीत जास्त लोकांसोबत संपर्क येतो. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सोमवारपासून याठिकणी लसीकरण केले जाईल, असे थेटे यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांसाठीचे केंद्र
भवानी नगर आरोग्य केंद्र, नेहरू नगर आरोग्य केंद्र, नेहरू नगर आरोग्य केंद्र, चिकलठाणा आरोग्य केंद्र, बन्सीलाल नगर आरोग्य केंद्र, कोकण वाडी चौक, क्रांती चौक आरोग्य केंद्र, सादात नगर आरोग्य केंद्र, गांधी नगर-खोकडपुरा आरोग्य केंद्र, औरंगपुरा आरोग्य केंद्र, जिन्सी आरोग्य केंद्र, पुंडलिक नगर आरोग्य केंद्र.
बँक कर्मचाऱ्यांसाठी केंद्र
आरेफ कॉलनी आरोग्य केंद्र, क्रांती चौक आरोग्य केंद्र, कैसर कॉलनी आरोग्य केंद्र, नेहरू नगर आरोग्य केंद्र, अंबिका नगर आरोग्य केंद्र, शिवाजी नगर आरोग्य केंद्र, बन्सीलाल नगर आरोग्य केंद्र, पीर बाजार आरोग्य केंद्र, पीर बाजार आरोग्य केंद्र
कामगारांसाठी केंद्र
नारेगाव आरोग्य केंद्र (एन-७, सिडको, बी-१, गरवारे कम्युनिटी सेंटर, रामलीला मैदाना समोर, मसनतपूर आरोग्य केंद्र, मसीआ कार्यालय, धूत हॉस्पिटलच्या मागे).
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : पुणेकरांसाठी नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु, काय बंद?
- …’तर पुढील एक-दोन दिवसांत भाजी मार्केट देखील बंद करणार’
- लॉकडाऊनचा तिसरा दिवस, मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेली मदत कधी मिळणार? रिक्षाचालक, पथविक्रेते प्रतिक्षेत!
- ‘भाजप सत्तेत नसलेल्या राज्यांवर केंद्राचा अन्याय’ सोनिया गांधींची टीका
- हिंगोलीमध्ये हळदीचे दर घसरले परंतू संचारबंदीमध्येही आवक मात्र सुरुच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

