Share

कोरोनाचा उद्रेक! गोव्यात उद्यापासून लॉकडाऊन, सीमा बंद

Published On: 

पणजी : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. अनेक राज्यांनी यामुळे कडक निर्बंध लागू केलेत. महाराष्ट्रात १ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. हा कालावधी आणखी १५ दिवसांनी वाढू शकतो अशी शक्यता आहेत. तर दुसरीकडे वाढत्या रुग्णसंख्येमुळे गोवा सरकारने राज्यात लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केलीय.

पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. उद्या, २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून ३ मे रोजी सकाळपर्यंत हा लॉकडाउन लागू असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. पण सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गोव्यातील कसिनो, हॉटेल, पब हे देखील लॉकडाउन दरम्यान बंदच ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबतच गोव्याच्या सीमारेषा अत्यावश्यक सेवांसाठीच सुरू ठेवल्या जातील, असं देखील गोवा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

लॉकडाऊन काळात मुख्य आकर्षण असलेले गोव्यातील सर्व कसिनो आणि बार बंद राहणार आहेत. शिवाय, फक्त होम डिलीव्हरीसाठी रेस्टॉरंट सुरू राहतील. रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये जेवण्यास बंदी असेल. राज्यात कुठेही अत्यावश्यक सेवांच्या व्यवहारांसाठी किंवा कामांसाठी बंदी नसेल. लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच ३ मे रोजी सकाळपर्यंत पर्यटकांना आपापल्या वास्तव्याच्या ठिकाणीच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!