Share

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले ‘अग्निपंख’

Published On: 

पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारासंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब विधान चंद्रकांत पाटलांनी केल आहे.

काही जण नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काहीतरी काळंबेरं पसरवत असतात. पण अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला, संशोधक माणसाला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल आहे. यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका होत आहे.

याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या विषयी खरी माहिती मिळावी यासाठी त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘अग्निपंख’ हे कलाम साहेबांचे आत्मचरित्र त्यांच्या स्विय सहायकांकडे भेट देण्यात आले.

‘चंद्रकांत दादांनी ते आत्मचरित्र नक्की वाचावे आणि खरा इतिहास माहीत करुन घ्यावा.’ असे मत यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे, शहराध्यक्ष महेश हांडे, कोथरूड युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष राकेश मारणे, शिवाजीनगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश भांड, धनंजय केळकर, आशिष शिंदे, लखन सैदगर, राम सरवदे, रितेश घडसिंग, प्रतीक गायकवाड उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!