🕒 1 min read
नवी दिल्ली- दिवाळीनंतर देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे. दिल्लीतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणित वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतीविषयक कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी कॉंग्रेसने केली होती. मात्र आता सरकारने अधिवेशन स्थगित केल्याने नवा पेचप्रसंग उभा राहण्याची शक्यता आहे.
संसदेचे अधिवेशन रद्द झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी अधिवेशन रद्द करण्यावरुन भाजपाला टोला लगावला आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द होत असल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत वल्लभ यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
हा कोरोनापण विचित्रच आहे. नीट तसेच जेईई परीक्षांच्या काळात, बिहार तसेच बंगालमधील निवडणूक प्रचारसभांच्या वेळी आणि मध्य प्रदेशमध्ये निवडून आलेली सरकार पाडताना तो सक्रीय नव्हता. तो केवळ संसदेच्या अधिवेशन काळामध्ये सक्रीय होतो, असा टोला वल्लभ यांनी लगावला आहे. वल्लभ यांचे हे ट्विट एक हजारहून अधिक जणांनी शेअर केलं असून पाच हजारहून अधिक जणांनी लाईक केलं आहे.
ये कोरोना वायरस भी अजीब है। NEET/JEE परीक्षा के दौरान, बिहार- बंगाल की चुनावी रैलियों में, MP में चुनी हुई सरकार को गिराने के वक्त ये एक्टिव नहीं रहता है।
सिर्फ संसद के सत्र के दौरान ये एक्टिव हो जाता है। pic.twitter.com/nw8UyOlkSp
— Prof. Gourav Vallabh (@GouravVallabh) December 15, 2020
महत्वाच्या बातम्या
- शाब्दिक कोट्या करून टाळ्या मिळवणं इतकंच ठाकरेंच्या भाषणाचं सार – भाजप
- ‘चांगला कलाकार, चांगला माणूस असेलच अस नाही.’ कंगना – स्वरामध्ये पुन्हा रंगल वाकयुद्ध !
- कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करणारी महाराष्ट्रातील ‘ही’ ग्रामपंचायत ठरली देशातील पहिली ग्रामपंचायत
- अशोक चव्हाणांसारखा निष्क्रिय माणूस आजपर्यंत पाहिला नाही- विनायक मेटे
- राज्य सरकारने घेतलेल्या आवश्यक खबरदारीमुळे कोरोनाची साथ नियंत्रणात आली – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
