नाशिक : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक शहरात कोरोना पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, नियम न पाळणाऱ्यांवर आता पालिकेकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसंच सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. १० वी,१२ वी मात्र पालकांच्या संमतीने ऐच्छिक सुरू राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी उद्यापासून ७ दिवस बंद राहणार आहे. त्र्यंबकेश्वर नगरीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र मंदिरातील पूजाविधी सुरु राहणार आहे.
नाशिकमध्ये दररोज अडीच ते तीन हजार नवे कोरोनाबाधित आढळून येत असल्याने शहरातील वातावरण गंभीर वळणावर आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मंदिर शासनाने हा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्य
- सचिन वाझेचे सारेच मालक चिंतेत: देवेंद्र फडणवीसांचा टोला
- बंदीतही नारेगावात धूमधडाक्यात लावले लग्न
- विषय शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन, 28 मार्चपर्यंत ऑनलाईन माहिती भरावी
- ‘राणा बाई दिपालीच्या मृत्यूला आपण देखील जबाबदार हे ‘मगरमच्छ के आँसू’ काय कामाचे’ ?
- महाराष्ट्रात कोरोना रोखण्यासाठी फडणवीसांनी सरकारला दिला ‘हा’ मंत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

