उस्मानाबाद: शहरात सर्वत्र निर्बंध लादले असूनही पाचवीच्या पुढील शाळा मात्र सुरूच आहेत. वाढलेल्या गर्दीमुळे अनेक खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिक्षण विभागाने मात्र अशा परिस्थितीत शाळा बंद किंवा सुरू ठेवण्याचे अधिकार शालेय स्तरावर सोपविले आहेत. गर्दीमुळे नियम पाळणे कठीण होत असून, शासनाने परीक्षेबद्दल निर्णय जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू केल्यानंतर २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. शाळा सुरू करताना प्रशासनाने विद्यार्थ्यांना उपस्थितीबाबत सक्ती न करण्याचे आवाहन केले होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी राहीला पण त्यानंतर उपस्थिती वाढत गेली आणि फेब्रुवारीच्या अखेरीस व मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. अशा परिस्थितीत ५ वी ते १२ वीपर्यंतचे सर्व वर्ग सुरूच आहेत. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव शाळांमध्ये सुद्धा झाल्याचे चित्र समोर येत आहे तसेच कोरोनाचा संसर्ग विद्यार्थ्यांमध्ये दिसू लागला आहे. कोरोनासंदर्भात नियम पाळताना दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर असणे आवश्यक आहे. मात्र शहरातील शाळांमध्ये वेगवेगळ्या भागातून रिक्षा तसेच स्कूल बसमधून अनेक विद्यार्थी प्रवास करतात, अशावेळी नियम पाळणे अशक्य होते. त्यामुळे कोरोनाचा धोका जास्त निर्माण होण्याची शक्याता वाढते.
शिक्षण अधिकारी गजानन सुसर यांना या परिस्थिती बद्दल विचारले असता ते म्हणले, शहरातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती आहे. मात्र, आम्ही सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल सक्ती करू नका, अशा सूचना सर्व शाळांना दिल्या आहेत. अशा परिस्थितीत किती वर्ग सुरू ठेवायचे, याबद्दलचे अधिकार शालेय स्तरावर समित्यांना दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धेाका होऊ नये, असे नियोजन शाळांनी करावे, अशी माहिती त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- अस्तनीतल्या निखाऱ्यांना वेळीच दूर करा हे बाळासाहेब सांगायचे – संजय राऊत
- ‘जनतेच्या मनातून पोलिस दलाला उतरवण्याचे काम कोण करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही’
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ऑटोकार पुरस्कार सोहळ्यात महिंद्राची ‘ही’ गाडी ठरली ‘कार ऑफ द ईयर’
- चिंताजनक! परभणी जिल्ह्यात एकाच दिवसात ३७३ कोरोना बाधितांची भर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
