Share

चिंताजनक! परभणी जिल्ह्यात एकाच दिवसात ३७३ कोरोना बाधितांची भर

Published On: 

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन प्रशासनने संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला असला तरी मात्र रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभरात ३७३ कोरोना बाधितांची भर पडली आहे. यामुळे कोरोना बाधितांची संख्या १२ हजारांच्या जवळ पोहोचली असून ही संख्या गुरूवारी सायंकाळपर्यंत ११ हजार ९९५ पर्यंत पोहोचली आहे. याचबरोबर दिवसभरात पाच रूग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ३६९ पर्यंत पोहोचली आहे.

आजपर्यंत जिल्ह्यातील १० हजार ३८ कोरोनामुक्त रूग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत १ हजार ५८८ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ४८ कोरोनामुक्त रूग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. दिवसभरात २ हजार ५०७ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. यात ४७४ जणांची रॅपिड तर २ हजार ३३ जणांची आरटीपीसीआरद्वारे तपासणी करण्यात आली आहे.

यात २ हजार १३४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात रॅपिड तपासणीतील ३४९ तर आरटीपीसीआर तपासणीतील १ हजार ७८५ जणांचा समावेश आहे. रॅपिड तपासणीतील १२५ तर आरटीपीसीआर तपासणीतील २४८ अशा एकूण ३७३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत १ लाख ५६ हजार ५७७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून यातील १ लाख ४४ हजार १ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!