Share

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाचा संसर्ग

Published On: 

नवी दिल्ली: महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा वाढतच आहे. सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.यातून सरकारचे मंत्री सुद्धा वाचले नाहीत. यातच आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

19 मार्चला बिर्ला यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून 30 मार्चला त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालय़ात दाखल करण्यात आले आहे. एम्सने बुलेटीन काढून बिर्ला यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सने म्हटले आहे.

सध्या देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43,846 नवीन रुग्ण सापडले आहेत. यापैकी जवळपास 27 हजार रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,15,99,130 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सलग ११ व्या दिवशी वाढून 3,09,087 एवढी झाली आहे. तर बरे होण्याचा दर घसरून 95.96 राहिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!