Share

“यांनी भाजपच्या इतक्या सीडी लावल्या की यांच्यात ईडी घुसली..” धनंजय मुंडेचा राज ठाकरेंवर तुफान हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

सांगली : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेताच तुफान हल्ला चढवला. “यांनी भाजपच्या इतक्या सीडी लावल्या की यांच्यातच ईडी घुसली,” असा घणाघाती हल्ला धनंजय मुंडे यांनी केला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या सभेदरम्यान धनंजय मुंडे बोलत होते.

धनंजय मुंडे यांनी भाषण केले. ते म्हणाले की, “आम्ही लहानपणी रामदास पाध्ये यांचा कार्यक्रम पाहायचो. त्यांच्या हातात अर्धवटराव नावाचा एक पुतळा असायचा. जे रामदास पाध्येला बोलायचे नाही, ते पाध्ये अर्धवटरावाच्या तोंडून बोलायचे. आज भाजप अर्धवट रावाच्या तोंडून बोलत आहे. या अर्धवट रावांनी मागच्या निवडणुकीत भाजपची सीडी लावली. त्यानंतर त्यांच्यामागे ईडी लागली आणि आता ते म्हणतायत कुठेय ती सीडी?”

यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, प्रतिक पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!