Share

…तर महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल, विजय वडेट्टीवार यांनी केली भीती व्यक्त

Published On: 

मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येतील दैनंदिन वाढ सुरूच आहे. राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून परिस्थिती आणखी बिकट बनत चालली आहे. राज्यात अंशतः आणि आठवड्याच्या अखेरीस कडक निर्बंध लावूनसुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आणखी कडक निर्बंध लावण्याच्या विचारात राज्य सरकार आहे.

राज्यातील कोरोनाचा कहर वाढलेला आहे. तज्ज्ञांच्या मते मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

राज्यात बेड्सची कमतरता आहे. बेड्स एका दिवसात वाढवता येतीलही. परंतु, नर्स आणि डॉक्टर कुठून आणणार? नर्स आणि डॉक्टर्स काही आभाळातून पडणार नाहीत, त्यामुळे नागरिकांनीच याचा विचार करावा. विनाकारण गर्दी करू नये. ताप अंगावर काढू नये, तात्काळ उपचार घ्यावेत आणि कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

दरम्यान, भविष्यात ही परिस्थिती अधिक भयावह होणार आहे. या कोरोनातून वाचायचं असेल तर अजिबात घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन होईल तेव्हा होईल. परंतु, तुम्ही घराबाहेर पडू नका. जर परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!