परभणी : जिल्ह्यात नागरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बांधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विदर्भातील जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणार्या व विदर्भात जाणाऱ्या खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहतूकीस सात मार्चपर्यंत प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्ह्याधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी नवे आदेश जारी केले आहेत.
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यातून परभणीत जिल्ह्यात येणाऱ्या व परभणी जिल्ह्यातून वरिल सर्व जिल्ह्यात जाणाऱ्या खासगी व सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांनी 28 फेब्रुवारीला प्रतिबंध जारी केले होते. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच असल्यामुळे आता सात मार्चपर्यंत विदर्भातील वाहतुकीस प्रतिबंध जारी करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत. या प्रतिबंधातून पूर्वपरवानगीने अत्यावश्यक सेवेस सूट देण्यात येईल, असेही नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- …लाईट बिल भरा ! भन्नाट उखाण्याद्वारे नवरदेवाचे आवाहन; व्हिडीओ व्हायरल
- सावधान! ‘या’ रुग्णांची माहिती लपवल्यास होणार २ वर्षांचा कारावास
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद

