Share

वेळीच सावध व्हा ! कोरोना रोगाचे शरीरावर गंभीर दुष्परिणाम; डायबेटीस होण्याची शक्यता वाढली

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची भीती असली तरी याहून अधिक जास्त गंभीरता आहे ती कोरोनामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची! हा रोग केवळ यावरील औषध नसल्याने गंभीर नसून, या कोव्हीड-१९ व्हायरसमुळे शरीरावर होणाऱ्या परिणांमुळे याला शास्त्रज्ञांनी गंभीर मानलं आहे. पोस्ट कोव्हीड आजार म्हणजेच कोरोना होऊन गेल्यानंतरही शरीराला मोठ्या आजारांचे धोके अधिक संभवतात.

कोरोना होऊन गेल्यानंतर टाईप-२ चा डायबेटीस होण्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. लंडनमधील किंग्ज कॉलेज आणि मोनार्च विद्यापीठाने कोरोनाचे शरीरावर होणाऱ्या परिणामांवर अभ्यास केला. यातूनच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना आतड्यांवर हल्ला करतो. यामुळे आतड्यांची इन्सुलिन निर्माण करण्याची क्षमता कमी होते. परिणामी डायबेटीस उद्भवतो. सद्याच्या जीवनपद्धतीमुळे तरुणांमध्येही रक्तदाब, डायबेटीस सारखे आजार आढळून येतात. अशातच कोरोनामुळे याची शक्यता वाढली आहे.

यासोबतच, कोरोनामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, त्यांचा परिणाम रक्तातील साखरेवर होतो. तर, काही रुग्णांना स्ट्रेरॉईड दिले जातात. यामुळे देखील डायबेटीस होतो. या व्हायरसमुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता देखील कमी होते. यामुळे इतर आजारांना सहज निमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे वेळीच काळजी घ्या, आवश्यक नियम पाळा व शरीराची इजा रोखा.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!