अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. अहमदनगर शहरात तर रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असून, मृतांच्या आकड्यातही वाढ होत आहे. सध्या शहरातील अमरधाम परिसरात होत असलेल्या दशक्रिया विधींनाही मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे दशक्रिया विधी करणारे पुरोहितच बाधित झाले आहेत. कोरोनाची बाधा टाळण्यासाठी पुढील १५ दिवस अमरधाममध्ये दशक्रिया विधीचे काम न करण्याचा निर्णय जिल्हा पुरोहित संघाने घेतला आहे.
जिल्हा पुरोहित मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी म्हटले आहे की, नगर येथील अमरधाममध्ये होणारे दशक्रिया विधीचे काम ११ ते २९ सप्टेंबर याकाळात पुरोहितांकडून करण्यात येणार नाही. तसेच अमरधाममध्ये कोणत्याही प्रकारचे विधी केले जाणार नाहीत. अंत्यविधी व दशक्रियाविधीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोना बाधित झाले आहेत. कोरोनामुळे दोन ते तीन पुरोहितांचा मृत्यू देखील झाला आहे. मृत झालेली व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती पुरोहितांना दिली जात नाही. त्यामुळेच अनेक पुरोहित कोरोना बाधित होत असल्याचे समोर आले आहे, असे जोशी म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा २८ हजारांच्या पुढे आहे. दररोज सुमारे १८ ते २० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून अहमदनगर जिल्हा पुरोहित मंडळाने कोणतेही धार्मिक विधी अमरधाममध्ये न करण्याचा निर्णय सर्वांनुमते घेतला आहे, असे जोशी यांनी म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- राज्यात महाराष्ट्र सरकारचा ‘गुंडा राज’; पुन्हा एकदा कंगना रनौतने महाराष्ट्र सरकारवर ओढले ताशेरे
- आता दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तानसोबत टक्केवारी? आशिष शेलरांची शिवसेनेवर बोचरी टीका!
- अभिनेता कुशल बद्रिकेने मांडली ठाणेकरांची व्यथा, महापालिकेकडे हि विनंती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

