Share

‘कोरोनाचे संकट अद्याप टळलेलं नाही, शाळा सुरू करण्याबाबत कृती दलासोबत चर्चा करूनच निर्णय होणार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – कोरोनाचे संकट अद्याप टळलेलं नाही. शाळा सुरू करण्याबाबत कृती दलासोबत चर्चा करूनच निर्णय होणार आहे अशी स्पष्ट भूमिका राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल घेतली. हिंगोली जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये हजर राहण्यासाठी काल त्या हिंगोली दौ-यावर होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना शाळा सुरु करण्यासंदर्भातील प्रश्नावर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.

कोरोना संक्रमण काही अंशी कमी झाल्यामुळं जुलै महिन्यामध्ये शाळा सुरू करण्याबाबत आम्ही सूतोवाच केलं होतं. परंतु सणासुदीच्या काळातील गर्दीमुळं संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेनं वर्तवल्यानंतर तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. आता गणपती उत्सवानंतर अनेक नागरिक एकत्रित आले आहेत. पंधरा दिवसांच्या काळामध्ये या एकत्रित येण्याचा आणि कोरोनाच्या संक्रमणाचा अंदाज घेतला जाईल. त्यानंतर निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात काल 4 हजार 21 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. यामुळे आतापर्यंत राज्यातील 63 लाख 44 हजार 744 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.2 शतांश टक्के झालं आहे. राज्यात काल 3 हजार 131 नवीन रुग्णांचं निदान झालं तर कोविड-19 मुळे 70 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील मृत्यू दर 2.12 शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या 40 हजार 712 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!