Share

#corona : अमरावतीवर कोरोनाचे संकट, रुग्णसंख्या 157वर : हबीबनगर कंटेनमेट म्हणून जाहीर

Published On: 

अमरावती : अमरावतीमध्येही कोरोनाने आपला असर दाखवायला सुरवात केली आहे. नाही नाही म्हणता अमरावतीमध्येही आता 157 कोरोनारुग्ण आढळले आहेत. आज सकाळी हबीबनगरात एकाच कुुटुंबातील तीन व अन्य एक तसेच कोविड रुग्णालयातील एक महिला कर्मचारी अशा एकूण पाच व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर या पाचही जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठद्वारे प्राप्त अहवालानुसार, हबीबनगरातील 31 वर्षीय व्यक्ती 21 तारखेला कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात येऊन त्यांचा स्वॅब तपासणीला पाठविला होता.

त्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. यामध्ये पाच वर्षीय चिमुकली, 30 व 65 वर्षीय महिला व 33 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. तर हे पाचही जणकोरोनाबाधित असल्याचे अहवालातून समोर आले आहे. या सर्व बाधितांवर डॉक्टर्स आता उपचार करत आहेत.

तसेच कोविड रुग्णालयातील 45 वर्षीय परिचारिकेचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. कोविड रुग्णालयात 10 दिवसांची सेवा आटोपल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येते. या महिलेचा थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविण्यात आला होता. याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाल्याने कोविड रुग्नालयातील चौथा वॉरिअर संक्रमित झाला आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 47190वर गेला आहे. तर आतापर्यंत 1577 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सुदैवाची बाब म्हणजे आतापर्यंत 13404 जण हे कोरोनावर मात करून घरी गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या

भक्त मंडळींना आवरा, एका भाजप मंत्र्याने चक्क पंतप्रधान मोदींवरचं रचली आरती

#corona : पुणेकर संकटात, सलग पाचव्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ

#corona : कोरोनाचा पीएमपीएमएला मोठा फटका, 67 दिवसात 100 कोटीचे नुकसान

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!