Share

#corona : पुणेकर संकटात, सलग पाचव्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ

Published On: 

पुणे : राज्यातील कोरोनाचाबाधितांचा आकडा आता 50 हजारच्या जवळ आला असताना पुण्यातही रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात 250 हुन अधिक रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात शनिवारी ग्रामीण आणि शहर मिळून 269 नवे रूग्ण सापडले. त्यापैकी पुणे शहरातले 205 होते तर पिंपरी चिंचवडमधील 46जण कोरोनाबाधित होते. तर ग्रामीण भागात देखील कोरोना पसरला असल्याने 13 नवीन रुग्णांची काल भर पडली. पुण्यात सध्या आतापर्यंत 5117जण कोरोनाबाधित आढळली आहेत.

तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. 23 मे रोजी दिवसभरात 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झाल्यामुळे या रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाचा पीएमपीएमएला मोठा फटका, 67 दिवसात 100 कोटीचे नुकसान

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या लॉकडाऊनचा परिणाम वाहतूक सेवांवरही झाला. अनेक शासकीय बस सेवा गेले अनेक दिवस बंद असल्याने त्याचा परिणाम तिजोरीवर झाला आहे. तर आता आलेल्या माहितीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळावरही (पीएमपीएमएल) आर्थिक संकट आले आहे. लॉकडाऊनमध्ये पीएमपीएमएलची सेवा गेली 67 दिवस बंद असल्याने तब्बल 100 कोटींचे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

#corona : कोरोनाचा पीएमपीएमएला मोठा फटका, 67 दिवसात 100 कोटीचे नुकसान

‘त्याने’ कोरोना होतो, असं ‘डॉक्टर’ अजित पवारांनी सांगितलंय – संजय राऊत

‘राज्य शासन परप्रांतीयांना अन्नधान्य देऊन शकले नाही म्हणून ते गावाकडे पायी निघाले’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!