Share

#corona : कोरोनाचा पीएमपीएमएला मोठा फटका, 67 दिवसात 100 कोटीचे नुकसान

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या लॉकडाऊनचा परिणाम वाहतूक सेवांवरही झाला. अनेक शासकीय बस सेवा गेले अनेक दिवस बंद असल्याने त्याचा परिणाम तिजोरीवर झाला आहे. तर आता आलेल्या माहितीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळावरही (पीएमपीएमएल) आर्थिक संकट आले आहे. लॉकडाऊनमध्ये पीएमपीएमएलची सेवा गेली 67 दिवस बंद असल्याने तब्बल 100 कोटींचे नुकसान झाले आहे.

लॉकडाऊन होण्यापूर्वी पीएमपीएमएलचे दररोजचे सरासरी उत्पन्न एक कोटी 60 लाखांपर्यंत होते. तर दरमहा 45 ते 50 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. पण 17 मार्चपासून पीएमपीएमएल सेवा बंद असल्यामुळे पीएमपीएमएल विभागाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.

सध्या स्थितीला अत्यावश्यक सेवेतील फक्त 100 बसेस सुरु आहेत. या बसेसमधून 60 दिवसात फक्त एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे आता कर्माचाऱ्यांचे पगार, बसेसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च कसा करावा, असा प्रश्न आता प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.

तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड हद्दीतील बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला आता रेड झोनमधून बाहेर आली आहे. त्यामुळे या शहरावरील अनेक निर्बंध आता कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये किमान 15 मार्गांसाठी बस सेवा सुरू होणार आहे. मात्र प्रवास करताना प्रवाशांना काटेकोर नियम पाळावे लागणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

‘त्याने’ कोरोना होतो, असं ‘डॉक्टर’ अजित पवारांनी सांगितलंय – संजय राऊत

‘राज्य शासन परप्रांतीयांना अन्नधान्य देऊन शकले नाही म्हणून ते गावाकडे पायी निघाले’

युवराज सिंगने संघ निवड समितीवर केले गंभीर आरोप, म्हणाला…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!