Share

वेशीवरच कोरोना संसर्गाला ब्रेक, औरंगाबादेत आज सहा एन्ट्री पॉइंटवर शून्य पॉझिटिव्ह!

Published On: 

औरंगाबाद : शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर शहरात येणाऱ्या प्रवाशांची महापालिकेतर्फे काही महिन्यांपासून ॲन्टीजेन चाचणी केली जात आहे. सोमवारी (दि. १४) पहिल्यांदाच कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. विशेष म्हणजे दिवसभरात तब्बल २१२४ जणांची चाचणी करण्यात आली.

शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने शहराच्या एन्ट्री पॉइंटवर फेब्रुवारी महिन्यापासून पथके तैनात केली आहेत. याठिकाणी शहरात येणाऱ्या प्रवाशांच्या ॲन्टीजेन पद्धतीने चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असताना याठिकाणी पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रवाशांची संख्या १०० च्या जवळपास गेली होती.

पण दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात होताच पॉझिटिव्ह निघणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सोमवारी एकही प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आला नाही. रविवारी (दि. १३) केवळ दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले होते.

एन्ट्री पॉइंटवरील चाचण्या

चिकलठाणा- २३७
हर्सूल टी पॉइंट- १९७
कांचनवाडी- ४५५
झाल्टा फाटा- ३९४
नगर नाका-४४३
दौलताबाद टी पॉइंट-३९८

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!