नांदेड: जिल्ह्यात मंगळवारी ४ हजार ४१६ अहवालापैकी १ हजार ४ अहवाल कोरोना बाधीत आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७५३ तर अँटिजेन तपासणीद्वारे २५१ अहवाल बाधीत आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ७७ हजार ९३२ एवढी झाली असून यातील ६३ हजार ७८२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या १२ हजार ४०५ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी २४९ बाधीतांची प्रकृती अतिगंभीर आहे.
२५ ते २७ एप्रिलदरम्यान २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधीत मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ४८३ एवढी झाली आहे. २५ एप्रिल रोजी मुखेड कोविड रुग्णालयात मुखेड तालुक्यातील सकनुर येथील ५० वर्षाचा पुरुष, व्हिजन रुग्णालय नांदेड येथे एस.व्ही.एम कॉलनी किनवट येथील ४५ वर्षाचा पुरुष, मुदखेड तालुक्यातील डोणगाव येथील ६० वर्षाचा पुरुष, झेंडा चौक नांदेड येथील ६४ वर्षाचा पुरुष, अपेक्षा रुग्णालय नांदेड येथे आशीर्वादनगर नांदेड येथील ६४ वर्षाचा पुरुष २६ एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील भोकर तालुक्यातील धामदरी येथील ५० वर्षाचा पुरुष
मुदखेड तालुक्यातील धनज येथील ६५ वर्षाचा पुरुष, मुदखेड येथील ४७ वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील ८२ वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे कंधार तालुक्यातील शिराढोण येथील ८५ वर्षाची महिला, पाकीजानगर नांदेड येथील ६५ वर्षाची महिला,हदगाव तालुक्यातील ठाकूरवाडी येथील ५५ वर्षाचा पुरुष, धर्माबाद येथील ५५ वर्षाची महिला, सरपंचनगर नांदेड येथील ५९ वर्षाची महिला, भोकर येथील ६५ वर्षाची महिला, नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथील ६५ वर्षाची महिला, लोहा कोविड रुग्णालयात टेळकी तालुका लोहा येथील ६० वर्षाची महिला, देगलूर कोविड रुग्णालयात शहापूर तालुका देगलूर येथील ७१ वर्षाची महिला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या
- अवघ्या १ धावेने पराभूत झाल्यानंतर भावूक रिषभ पंतचे विराटने केले सांत्वन; व्हिडीओ व्हायरल
- आखेरच्या चेंडुपर्यंत रंगलेल्या सामन्यात एका धावेने आरसीबीने दिल्लीवर केली मात
- रुग्णालयातील अग्नितांडव थांबेना;मुंब्रा येथे चार रुग्णांचा होरपळून मृत्यू
- परभणी जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित, २० रुग्णांचा मृत्यू, नागरिकांनो काळजी घ्या
- महिलेचा नातेवाईकाकडून विनयभंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

