मुंबई : कोरोनाच्या लढाईत आणखी 2 पोलिस शहीद झाले आहेत. तर एका दिवसात तब्बल 79 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाने राज्यात आतापर्यंत 12 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 140 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांसह अजित पवार यांच्यावरही केलं भाष्य म्हणाले…
कोरोनाच्या संकटात पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र कोरोनाने त्यांना देखील आपल्या कवेत घेतले आहे. त्यात आता आणखी दोन पोलीस कोरोना विरुद्धच्या युद्धात शहीद झाले आहेत. तर एका दिवसात तब्बल 79 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजार 140 वर पोहोचला आहे. यात 120 अधिकारी आणि 1020 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
‘मी तुमची सायकल घेत आहे, मला माफ करा’ मजुराचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान पोलिसांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी अभिनेता अक्षय कुमार याने पुढे येऊन नाशिक पोलिसांना 500 अत्याधुनिक हातातली घड्याळं दिली आहेत. हे घड्याळ पोलिसांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करणार आहे.
विधानपरिषद निवडणूक : भाजपच्या उमेदवाराने गुन्ह्य़ाची माहिती लपवली ? प्रतिज्ञापत्रावरून नवे वादळ
अक्षय कुमारने वाटप केलेल्या घड्याळांमध्ये दररोज शरीराचा रक्त दाब, तापमान, किती चाललो आणि किती कॅलरीज बर्न झाल्या याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे हे अत्याधुनिक घड्याळ जर पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या हातात असेल तर दिवसभरात हे अधिकारी किती फिरले? त्यांनी कामं केलीत का? याचंही मोजमाप करण्यास मदत मिळेल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

