नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीने जोर पकडला आहे. अनेक समाजिक संघटना आणि स्थानिक नेते ही मागणी करताना दिसून येत आहेत. लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे. तरी देखील अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना नवी मुंबईतील स्थानिक दि बा पाटील यांच्या नावावर ठाम आहेत. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून आज (24 जून) सिडकोला 1 लाख लोकांचं घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात सर्वात मुख्य म्हणजे नवी मुंबईतील महत्त्वाचे रस्ते आणि वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या मार्गात बदल होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- टाकळी अंतर्गत रस्त्याच्या निकृष्ट कामाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
- पराभवामुळे दु:खी झालेल्या कोहलीने दिला इशारा ; कसोटी संघात करणार बदल
- प्रसेनजीत पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्यामुळे बुलढाण्यातील राजकीय समीकरणे बदलणार ?
- दिलासा! पालकांना फीबाबत सक्ती केल्यास शाळांवर होणार कारवाई
- मृग नक्षत्राने फिरवली पाठ; पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
